श्री स्वरूपानंद स्वामी यांची आरती

पूजन करुनी सद्गुरुमूर्ती उजळियल्या ज्योती, स्वामिन् उजळियल्या ज्योती।
आरती मंगल करितो, नयनीं भरली श्रीमूर्ती ।।ध्रु.।।
पितामहींने द्वादश वरुषें तप केले घोर, वाडीसी तप केले घोर।
दीन दयाघन दत्तगुरुंनी फल दिधलें थोर।।
तुझिया वंशी अंश आमुचा येईल जन्मासी, बाळे येईल जन्मासी।।
दत्तवचन तें सदेह झालें तारक आम्हांसी ।।1।।
बालवयांतचि छंद लागला भगवद्गीतेचा, स्वामिसी भगवद्गीतेचा।।
जनहितकारक, सत्त्वविवर्धक, कविता रचनेचा।।
परोपरकारी अवघे जीवन, यौवन त्वां दिधलें, सद्गुरो, यौवन त्वां दिधलें।
ज्ञानसिंधुचे अमृतकलश बहु अंतरिं साठविलें ।।2।।
नागपंथिचा चरखा हातीं देत गणेशगुरू आपण देत गणेशगुरू।।
अजुनि अखंडित चरखा चाले सूत्रचि ऊँकारू।।
सोSहं गगनव्यापी विणुनी वस्त्र महा। उबेचे विणुनी वस्त्र महा।।
पदनत तनयां पदरी घेई गुरुमाय पहा ।।3।।।
कनकचंपकासम तनु विलसे, कमलनयन मूर्ती। स्वामींची कलमनयनमूर्ती।।
वचन सुधारमय, रूप अलांच्छन चंद्राची दी‍प्ति।। यज्ञ अपत्यां क्षमस्व स्वामिन् श्रीस्वरूपानंदा, माऊली, हे स्वरूपानंदा।
अलकावतिपति-चरण शरण यति सत्यदेवानन्दा।। 4।।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती