महाराष्ट्रात मराठा व दलित समाजात तेढ निर्माण करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा सरकारचा हा मोठा कट आहे. मात्र हे आम्ही विरोधक म्हणून कदापी होऊ देणार नाही. मराठा आरक्षणाबाबत 29 मोर्चे होऊनही शासनाने काहीच केलेले नाही त्यामुळे आता आमची सहनशक्ती आता संपली आहे. शासनाला मुकमोर्चाची भाषा समजत नसेल तर आम्हाला आता भाषा बदलावी लागेल तर, होणारा उद्रेक शासनाला न पचणारा असेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.