मराठा समाजाला आरक्षण : रेल्वेखाली एकाची आत्महत्या

सोमवार, 30 जुलै 2018 (16:37 IST)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी औरंगाबाद येथे एका मराठा समाजबांधवाने आत्महत्या केली आहे. कुंदवाडी भागात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद पाटील या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५१ येथे रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा प्रकार कळताच मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी बंदची हाक दिली त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.  या वेळी आत्महत्या करण्या आगोदर फेसबुकवर पोस्ट देखील लिहिली आहे.  प्रमोद पाटील हा तरुण मराठा समाजातून येत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षणा नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता असे समोर आले आहे.  विवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी करा… मराठा आरक्षणासाठी करा जय जिजाऊ… आपला प्रमोद पाटील…’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती