दरम्यान, विधानसभेवर बॉम्ब टाकण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर, सभापती डॉ. प्रेम कुमार यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि विधानसभा सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी तात्काळ प्रभारी सचिव ख्याती सिंग यांना मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना कळवण्याचे आणि विधानसभा परिसराची त्वरित सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश दिले. या पूर्वी काल देखील महाराष्ट्र विधानसभेला बॉम्बची धमकी देण्यात आली होती.