मराठा आंदोलनातील भाडोत्री लोकांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. हे आंदोलन बदनाम करायचे आहे, असा आरोप करतानाच आरक्षण देणे आता न्यायालयाच्या हातात आहे. त्यामुळे जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करून काहीही उपयोग होणार नाही. तरीही मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा, असे पाटील म्हणाले.
गाड्या फोडून काय साधणार
आंदोलन करून, गाड्या फोडून काहीही साध्य होणार नसल्याचे सांगतानाच आंदोलकांशी चर्चा करायला सरकार तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे निवडणूक वर्ष असल्याने या काळात हिंसक आंदोलनासारखे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे खर्या आंदोलकांनी या हिंसक प्रवृत्तींना आणि पेड आंदोलकांना बाजूला सारले पाहिजे, असे महसूलंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.