मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यात तणाव आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीपात्रात उडी मारून जीवन संपवणारा तरुण कार्यकर्ता काकासाहेब शिंदे याच्या अंत्यसंस्कारासाठी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे सात्वन करायला आले होते. मात्र ते राहिले बाजूला उलट मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला. खैरे यांनी इथे थांबू नये अशी भूमिका घेतली त्यांना धक्काबुक्की करत त्या ठिकाणाहून पळवून लावले आहे, गंगापूर तालुक्यातील कायगावमध्ये काकासाहेब दत्तात्रय शिंदे या २६ वर्षीय तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलक आक्रमक झालेत. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आज संप पुकारण्यात आला असून ठिकठिकाणी हिंसक आंदोलनही सुरू आहे. रास्ता रोको, गाड्यांची तोडफोड करून, टायर जाळून आंदोलक आपला संताप व्यक्त करताहेत. काहींनी तर आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्ष यावर राजकारण करतांना दिसत आहे.