जरांगेंचे उपोषण स्थगित, सग्यासोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 1 महिन्याचा अवधी

शुक्रवार, 14 जून 2024 (09:28 IST)
जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारच्या शिष्टमंडळात खासदार संदीपान भुमरे, राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई अंतरवाली सराटी येथे आले होते.
 
त्यांची जरांगे यांच्याशी चर्चा झाली असून शंभूराज देसाई यांनी 1 महिन्यात सगेसोयरे मागणीसह जरांगे यांनी सरकार कडे दिलेल्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याचा शब्द दिल्यावर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे.
 
यावेळी छत्रपती संभाजी नगरचे नुकतेच विजयी झालेले खासदार संदीपान भुमरे, राणा जगजितसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरकारला यामुळे 13 जुलै पर्यंतचा वेळ मिळाला असून या दरम्यान ते आपला शब्द पुरा करतील अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली.
 
यानंतर खालावलेल्या तब्येतीमुळे जरांगे यांन उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
 
मनोज जरांगे काय म्हणाले होते?
सरकार आम्हाला खेळवत राहिलं तर मी विधानसभेला उभं राहीन असा इशाराही त्यांनी दिला होता
 
ते म्हणाले,
उपोषण असे कसे स्थगित होईल, त्यांनी त्यांचे लोक इथे पाठवून जाहीर करावं की हे किती दिवसात करतील
57 लाख नोंदी मिळाल्यात त्याच्या आधारे कायदा किती दिवसात पारित करतील किती दिवसात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतील? हे स्पष्ट करायला हवं
उपोषण स्थगित होईल पण.... किती दिवसात करणार आहेत ?का लगेच करणार आहेत? असे अनेक प्रश्न आहेत.
 
जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे,
 
ओबीसी नेते स्वतःला प्रगल्भ विचारायचे म्हणून घेतात आणि इकडे बसणार आणि तिकडे बसणार म्हणतात जिथे तेढ निर्माण होईल तिथे तुम्ही बसणार का शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन नुसते भाषण ठोकतात.
हे सरकारचं षड्यंत्र आहे मुख्यमंत्र्याला आम्ही चांगलं मानतो शिंदे साहेबांना आजपर्यंत आम्ही चांगलं मानतो. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने अजून काय नवीन षडयंत्र रचले काय माहिती ?काय काय आमच्या बांधवांना ते दिल्लीला घेऊन जाऊ लागलेत.

ओबीसी नेते समजूनच घेत नाहीत मुळात म्हणजे ओबीसींना धक्काच लागत नाही ओबीसींचा याच्याशी संबंध येत नाही मराठा हाच कुणबी आहे कुणबी हाच मराठा आहे ते जाणून-बुजून समाजात तेढ निर्माण करत आहेत. मुख्यमंत्र्यांना मी आजही चांगलं मानतो मात्र त्यांचे ओएसडी लोकांना घेऊन दिल्लीला पळत आहेत मुंबई संपली आता दिल्लीला पळत आहे, काय साचा बनवून आणला असेल मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्यांना बदनाम करण्यासाठी.

वेळोवेळी असंच होत राहिले तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार आहे? कदाचित माझे शेवटचे उपोषण असेल असेच तुम्ही खेळवत राहिले तर मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेन.
मी शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो की मी असंच उपोषण स्थगित करू शकत नाही, काही गोष्टी सविस्तर माहिती झाल्या पाहिजे, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार का किती दिवस सात करणार आहेत केसेस लगेच मागे करणार की किती दिवसात करणार हे मला डिटेल पाहिजे, असे जरांगे म्हणाले.
आम्ही थोडे दिवस उपोषण करू आम्ही तरी किती दिवस उपोषण करणार तुम्ही जाणून-बुजूनच आम्हाला मारायला निघाला असता तर लागतील गोरगरीब मराठी सर्व जाती धर्माचे लोक विधानसभेच्या तयारीला. एवढा मोठा विषय मराठ्यांच्या आयुष्याचा आहे, लांबून गोळ्या मारून होत असतं का? प्रत्यक्ष चर्चा करूनच होईल माझ्या मते प्रतिक्षा चर्चा करून विषय गोडी गुलाबीने हाताळा उगाच तयारी नका करू जाळ रचून षडयंत्र रचून.

मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते कोणीही द्या आमचा शिंदे साहेबावरती सरकार वरती आजही विश्वास आहे देवेंद्र फडणवीस हे शत्रू नाहीत आमचे हे मी मागे सांगितलं आहे ते कार्य करतात ते आपल्याला जमत नाही, जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलले की मी कोणाचे खपवून घेत नाही त्यांनी हे सर्व बंद करावं ते काय माझे शत्रू आहेत का?आमचा सगळ्यांवरतीच विश्वास आहे आम्हाला आरक्षण द्या, कोणीही द्या मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील.
 
Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती