मराठा आरक्षण: मराठा आरक्षण आंदोलनात इंदुरीकर महाराजांची उडी, घेतला हा निर्णय

सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (09:51 IST)
सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील  यांचे आमरण उपोषण सुरु आहे. राज्यातील गावागावात मराठा समाज उपोषण करत आहे. या साठी गावात मोर्चे काढले जात आहे. सभा घेतल्या जात आहे. आता या आंदोलनातप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी उडी घेतली असून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आता 5 दिवस कोणताही कार्यक्रम किंवा कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

इंदुरीकर महाराजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या साठी महाराजानी येत्या 5 दिवसांपर्यंत कोणतेही कार्यक्रम आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला पाठिंबा देत त्यांनी आजवरचा हा मोठा निर्णय घेतला आहे. 

मी उपचार आणि पाणी घेणार नाही. कुटुंबानेही आता इथे येऊ नये. मी आधी समाजाचा आहे आणि मग कुटुंबाचा, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.मनोज जरांगे हे आमरण उपोषण करत असून आज 30 ऑक्टोबर त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.
 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती