गुणरत्ने सदावर्ते याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शॉक ट्रिटमेंट!

सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (20:56 IST)
राज्य भरात मराठा आरक्षण आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असताना गुणरत्ने सदावर्ते प्रक्षोभक विधाने करून सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी वादग्रस्त विधाने करत आहे. त्यामुळे सदावर्ते यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना शॉक ट्रिटमेंटची गरज असल्याने आज सदावर्तेंना शॉक ट्रिटमेंट दिली असल्याचे स्पष्टीकरण संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी दिले आहे.
 
कोल्हापूरातील शिवाजी पुतळा चौकात आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शॉक ट्रिटमेंट देऊन आंदोलन करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडने केलेल्या आंदोलनात अॅड. सदावर्ते यांच्या वक्तव्याचा आणि प्रक्षोभक भाषणांचा निषेध करण्यात आला.
 
संभाजी ब्रिगेडच्या या आंदोलनात मराठा आरक्षणाला राज्यभरातून सर्व समाजातून पाठींबा मिळत असताना फक्त राजकारणासाठी अॅड. सदावर्ते प्रक्षोभक विधाने करत असल्याचा आरोप करताना जिल्हाध्यक्ष निलेश सुतार म्हणाले, “मराठा समाजाकडून गेली कित्येक वर्षे आंदोलन सुरु आहे. कित्येक मुकमोर्चे निघाले. गेले काही महिन्यापासून मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणासाठी बसले आहेत. महाराष्ट्र सरकारने 40 दिवसाचा वेळ मागूनही सरकार आरक्षण देणेस असमर्थ ठरले आहे. वेळोवेळी मराठा समाजाला गाजर दाखविण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले असून सरकारने मराठा समाजाला फसवले आहे.” असे ते म्हणाले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “मराठा समाजाला जेव्हा जेव्हा आरक्षण देण्याची वेळ येत तेव्हा तेव्हा गुणरत्न सदावर्ते आरक्षणाला वारंवार विरोध करीत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात विधान केले होते. त्यामुळे आम्हाला असे वाटते की गुणरत्न सदावर्ते यांचे मेंदूवर परिणाम झाला आहे. तसेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मेंटल हायशॉक ट्रीटमेंटचा झटका दिलेला आहे. संभाजी बिग्रेडने दिलेल्या प्रतिगात्मक हायहोल्टेज ट्रिटमेंटनंत्तर गुणरत्ने यांची बुद्धी सुधारली नाही तर संभाजी ब्रिग्रेडच्यावतीने खरोखरचा शॉक देण्यात येईल.” असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती