पण चुकून ‘तो’ शब्द निघाला, संभाजी राजे यांच्याकडून खुलासा सादर

मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:22 IST)
मराठा आरक्षणासंदर्भात खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र, आता खुद्द संभाजी राजे भोसले यांनीच यासंदर्भातला खुलासा केला आहे. तसेच, ‘मला वेगळा शब्द वापरायचा होता. पण चुकून ‘तो’ शब्द निघाला. पण पत्रकारांनी विधानाचा विपर्यास केला आणि चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या’, अशा शब्दांत संभाजी राजेंनी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून संभाजी राजेंनी एका ट्वीटच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे. 
 
मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर संभाजी राजे म्हणाले होते, ‘मराठा आरक्षणासाठी आपण एसईबीसी कायदा केला. मागासवर्गीय आयोगाने देखील मराठा समाज मागास असल्याचं मान्य केलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळात कायदा पारित झाला. त्याला उच्च न्यायालयाचीही मान्यता मिळाली. पण तरी हा वाद सुरूच आहे. त्यासाठी केंद्रात घटना बदल करण्यासंदर्भात काही प्रयत्न करायचे असतील, तर त्या दृष्टीने माझा अभ्यास सुरू आहे’. इथे संभाजी राजेंनी ‘घटना बदल’ असा उल्लेख केल्यामुळे त्यावरून चर्चा सुरू झाली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती