मराठा आंदोलन गंभीर पणे घ्या -- सामना

मंगळवार, 20 सप्टेंबर 2016 (17:05 IST)
मराठा समाजाचे प्रश्न हाताळायला मुख्यमंत्री असमर्थ आहेत अशी परखड टीका भाजपाचा मित्र पक्ष शिवसेनेन मुखपत्र सामना यातून केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता पुन्हा भाजपा नेतृत्व बदल हवाय का अशी चर्चा सुरु झाली आहे. तुमच्या खुर्चीला पक्षातील स्वकीय सुरुग तर लावत नाहीत ना असे असेल तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे असा सल्ला सुद्धा सामनातून मुख्यमंत्र्यांना दिला आहे. शिवसेना जरी सत्तेत असली तरीही प्रत्येक वेळी भाजपावर टीका करते मात्र यावेळी त्यांनी राज्याचे मुखमंत्री आणि प्रमुख देवेंद्र फडणवीस यांचावारच  टीका केली आहे.हे विशेष.
 
हा मराठा करती मोर्चा आहे ही काय गंमत नाही तर या समजाचे  मोर्चे म्हणजे वाहती गंगा नसून समुद्रात उठलेले वादळ आहे. या तुफानाशी सामना करणारे भक्कम नेतृत्व आजतरी महाराष्ट्र राज्यात दिसत नाही असे अग्रलेखात परखडपणे म्हटले आहे.  महाराष्ट्रात निर्माण झालेली अस्वस्थता मुख्यमंत्री फडणवीस कशी दूर करणार? असा सवालही फडणवीसांना विचारण्यात आला आहे.  

मराठा मोर्चे म्हणजे मुख्यमंत्रीपदावरून आपल्याला काढण्याचा कट असल्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर ती त्यांची हतबलता आहे असे म्हटले आहे. शरद पवारांवरही अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. 
 
शेती व आरक्षणाबाबतची सरकारी अनास्था मराठा समाजाच्या उद्रेकास कारणीभूत आहे असे शरद पवार यांना वाटणे हा त्यांचा वैचारिक दोष आहे असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्रात पंधरा वर्षे सत्ता भोगणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीला होता. त्यांनी का निर्णय घेतले नाहीत? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे आता मराठा समाजच्या या प्रश्नावर सजग होऊन आणि गंभीर पणे तोडगा काढणे गरजेचे आहे बाळासाहेब नेहमी आर्थिक आरक्षण हवे असे म्हणत ते सत्य होते.त्यामुळे विद्यमान सरकारने आता योग्य निर्णय घ्यायचा आहे.
(संदर्भ - सामना वृत्तपत्र २० सप्टेंबर अग्रलेख)  

वेबदुनिया वर वाचा