तुम्‍ही मांगलिक असला तर जाणून घ्या या खास ठिकाणाबद्दल, जेथे होतो मंगल दोषावर उपाय

गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (12:24 IST)
Amalner mangal dosh puja मंगल दोषाची खूप भीती असते, पण हा दोष नसून अत्यंत शुभ मानला जाणारा योग आहे. जर तुमचे योग मांगलिक असेल तर तुम्ही काहीतरी खास आहात असे समजा. तुम्हाला आता काय करायचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही मांगलिक आहात, तुमच्या जन्मपत्रिकेत मंगलदोष आहे किंवा तुमचा मंगळ अशुभ आहे हे कसे ओळखावे.
 
Manglik dosh मांगलिक दोष : एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरात मंगळ असेल तर त्याला 'मांगलिक दोष' म्हणतात. काही विद्वानांना हा दोष तिन्ही लग्न म्हणजे लग्नाव्यतिरिक्त चंद्र लग्न, सूर्य लग्न आणि शुक्राहून देखील बघतात. मान्यतेनुसार, वर आणि वधू दोघांना 'मांगलिक दोष' असल्यास लग्न केलं जातं.
 
mangal dosh lakshan अशुभ मंगळाची चिन्हे : चौथ्या आणि आठव्या घरात मंगळ अशुभ मानला जातो. सूर्य आणि शनि मिळून मंगळ खराब होतो. केतू मंगळाच्या सहवासात असेल तर ते अशुभ ठरते. मंगळासोबत बुधाची उपस्थिती देखील चांगले परिणाम देत नाही. मंगळ कोणत्याही अर्थाने एकटा असेल तर तो पिंजऱ्यातल्या सिंहासारखा आहे.

मंगळाचा प्रभाव डोळ्यांवर पडतो. मंगळ अशुभ असेल तर डोळ्यांच्या बाहुल्या वरच्या बाजूला झुकतात. मंगळ खूप अशुभ असेल तर मोठा भाऊ नसण्याची शक्यता प्रबळ मानली जाते. भाऊ असेल तर त्याच्याशी वैर असतं. मुले होण्यात अडचणी येतात. जन्माला आल्यास त्यांच्या मृत्यूचा धोका असतो. जर मंगळ खूप वाईट असेल तर एक डोळा गमावण्याची शक्तया देखील असते. शरीराचे सांधे काम करत नाहीत. रक्ताची कमतरता किंवा अशुद्धता असते.
मंगळ शुभ असण्याची चिन्हे : मंगळ दहाव्या घरात असणे चांगले मानले जाते. सूर्य आणि बुध एकत्र शुभ ठरतात. मंगळ हा उत्तम सेनापतीचा स्वभाव आहे. अशी व्यक्ती न्यायी आणि प्रामाणिक राहते. शुभ असेल तर ती व्यक्ती एक शूर, सशस्त्र आणि लष्करी अधिकारी किंवा कंपनीत नेता किंवा महान नेता बनते. मंगळ हा चांगुलपणावर चालणारा ग्रह आहे, पण मंगळामुळे वाईटाकडे जाण्याची प्रेरणा मिळाली तर तो मागे फिरत नाही आणि हेच त्याच्या अशुभतेचे कारण आहे.
 
या ठिकाणी मंगळ दोषावर उपाय : महाराष्ट्रातील जळगावजवळील अमळनेर येथील श्री मंगळ देवतेचे स्थान हे प्राचीन आणि जागृत स्थान मानले जाते. मंगळदेव येथे पंचमुखी हनुमानजी तसेच भू-मातेसह विराजमान आहेत. हे पृथ्वीपुत्र मंगल देव यांचे जन्मस्थान असल्याचे मंदिराशी संबंधित भाविकांचे मत आहे. येथे मंगळवारी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यासोबतच मंगळाच्या शांतीसाठी येथे अभिषेक आणि हवन केला जातो. जे मांगलिक आहेत किंवा ज्यांचे लग्न होत नाही त्यांच्यासाठी येथे मंगळाची सामूहिक आणि विशेष पूजा केली जाते. असे म्हटले जाते की मंगळवारी येथे येऊन मंगलपूजा आणि अभिषेक केल्यास मंगल दोषापासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती सुखी वैवाहिक जीवन जगते.
 
 
मंगळाच्या शांतीसाठी येथे रोज अभिषेक केला जातो. मंगळवारी येथे अभिषेक करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते. सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी येथे भोमय अभिषेकही केला जातो.
 
दर मंगळवारी मंगळदेवाच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक केला जातो. यास सुमारे 2 तास लागतात. या अभिषेकासाठी केवळ एका भक्ताला पूजेचे साहित्य मिळते. मंगळवारच्या पंचामृत अभिषेकाप्रमाणेच 'श्री मंगलाभिषेक' देखील दररोज पहाटे 5 वाजता केला जातो. यासाठी देखील सुमारे 2 तास लागतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती