येत्या 12 सप्टेंबरनंतर आचारसंहिता लागू होणार

बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (16:44 IST)
राज्यात विधानसभा निवडणूक गणेशोत्सवानंतर म्हणजे 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. दोन टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता आहे. 
 
या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. दिवाळी 25 ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्याआधी मतदान होईल, असे सांगितले जाते. 
 
2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत राज्यात गणेशोत्सव आहे. 12 सप्टेंबरला गणेश विसर्जन झाल्यानंतर लगेचच सप्टेंबरच्या दुसर्‍याच आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. 2014 मध्ये गणेशोत्सवानंतरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. 15 ऑक्टोबर रोजी मतदान होऊन 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. यानंतर 31 ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती