आदित्य ठाकरे म्हणाले, “तेजसला संपूर्ण महाराष्ट्रात विविध जंगलांमध्ये जात असतो. कुठे तरी घाटात जातो आणि त्याचं काम करत असतो. मात्र, राजकीय दौरे कसे असतात हे त्याने फारसं पाहिलेलं नाही. त्याला हे पाहायचं होतं. म्हणून त्याने मी येऊ शकतो का असं विचारलं होतं. त्याला जनआशिर्वाद यात्रेतही एक-दोन ठिकाणी यायचं होतं. बुधवारी (9 ऑक्टोबर) उद्धव ठाकरे सभेसाठी जात होते. त्यांचा 2 दिवसांचा दौरा होता. त्यामुळे तो त्यांच्यासोबत आला.”
“तेजस राजकारणात प्रवेश करेल असं मला वाटत नाही. पण तरिही राजकारणात प्रवेश करायचा की नाही हा निर्णय संपूर्ण त्याचा असेल. मी राजकारणात सर्वांचंच स्वागत करेल.” यावेळी त्यांनी जंगलातील वाईल्ड लाईफ आणि राजकारणातील वाईल्ड लाईफ यात फरक असतो, असंही हसत नमूद केलं.