पुण्यातील राज ठाकरेंची सभा रद्द, राज गर्जना होणार आज मुंबईत दोन सभेत

गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (10:09 IST)
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसेप्रमुखराज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द करण्यात आली होती. मात्र पुण्यात सभा रद्द झाल्यानंतर मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या पुढील सभा मुंबईत आयोजित करण्यात आल्या आहेत.
 
पुण्यातील राज ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वीच पावसाने तुफान हजेरी लावली. यानंतर अखेर सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर आता राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीची पुढील दोन सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आल्या आहेत.
 
 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात होणारी पहिली प्रचार सभा पावसामुळे रद्द करावी लागली आहे. ईडीच्या चौकशीनंतर मनसेचे अध्यक्ष काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले होते. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग पुण्यातून फुकणार होते. काल झालेल्या पावसामुळे पाऊस सभा रद्द होऊ नये म्हणून  मैदान सुकवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले मात्र आज पुन्हा मुसळधार झालेल्या पावसामुळे अखेर सभा रद्द करावी लागली.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील आपल्या पहिल्या सभेतून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार होते.काल झालेल्या पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात चिकल साठला होता. मात्र कार्यकर्त्यांनी मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला पण सभेपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अखेर आजची सभा रद्द करावी लागली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उद्या मुंबईतील सांताक्रुझ पूर्व आणि गोरेगाव पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. ईडीच्या चौकशीनंतर शांत असलेले राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मनसे विधानसभा निवडणुका लढविणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
 
अखेर राज ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.आपल्या पहिल्याच सभेत ते कोणाचा समाचार घेणार याची उत्सुक्ता होती मात्र पावसाने सभेवर पाणी फिरविल्याने उद्याच्या मुंबईतील सभेत राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती