केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे. यासंदर्भात दिल्लीत 11 वाजता ते पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात आणखी एक ठिणगी पडली आहे. अरविंद सावंत शिवसेनेचे दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे खासदार आहेत.रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी………!
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 11, 2019
शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?
— Arvind Sawant (@AGSawant) November 11, 2019
आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे.
काल भाजपाने सत्तास्थापन करण्याबाबत असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली होती. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची असेल तर एनडीएतून बाहेर पडण्याचं आवाहन काल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलं होतं. तर शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या वर्तुळातही खलबतं सुरू आहेत.दरम्यान संजय राऊत यांनीही ट्विट करून सत्तास्थापनेबाबत एक सूचक वक्तव्य केलं आहे.