यंदाच्या निवडणुकीत ज्या विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाल्या आहेत त्यामध्ये मंदा म्हात्रे (बेलापूर) मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव), भारती लव्हेकर (वर्सोवा), यांचा समावेश आहे. या आठही भाजपच्या आमदार आहेत.
प्रथमच विधानसभेत निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे (देवळाली), शिवसेनेच्या लता सोनावणे (चोपडा) आणि यामिनी जाधव (भायखळा), भाजपच्या मुक्ता टिळक (कसबा पेठ), श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा (केज), काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (वरोरा) व सुलभा खोडके (अमरावती) यांचा समावेश आहे. गीता जैन (मिरा भाईंदर) आणि मंजुळा गावित (साक्री) या दोन अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.