शिवनेरी किल्ला

मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (13:49 IST)
17 व्या शतकातील असलेला हा किल्ला, शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ आहे. या किल्ल्यात देवी शिवाजीचे लहानशे देऊळ आहे. देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात असल्यामुळे ह्याचे नाव शिवनेरी ठेवण्यात आले. दुर्देवाने मराठा शासक ह्याचा वर राज्य करू शकले नाही, परंतु तरी ही दोन वेळा मराठ्यांनी ह्याच्या वर विजय मिळविण्याचा प्रयत्न केला होता. 
 
शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. या गडावर मुख्य दारा शिवाय एक साखळी दार देखील आहे. या साखळीला धरून पर्यटक डोंगर चढून किल्यावर पोहोचतात. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. येथे बदामी तलाव नावाचे पाण्याचे तलाव आणि गंगा, यमुना नावाचे पाण्याचे झरे आहे, इथे वर्षभर पाणी भरलेले असते.   
 
छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा.

शिवनेरी गडावर कसं पोहोचणार- 
पुणे हे एकमेव स्थळ आहे जिथून आपण शिवनेरी गडावर पोहोचू शकता.
 
सडक मार्गाने- 
पुणे शहरापासून शिवनेरी चे अंतर सुमारे 95 किमी आहे. एसटी आणि खाजगी सेवा नियमितपणे पुणे आणि मुंबई, हैद्राबाद, कोल्हापूर आणि गोवा सारख्या भारतातील विविध शहरामध्ये चालतात. जुन्नर मार्गे देखील बस ने जाऊ शकतो. पुण्यातून भाडेतत्वावर टेक्सी, किंवा अन्य वाहने किल्ल्यापर्यंत नेऊ शकतात.
 
रेल्वे मार्गाने-
पुणे रेल्वे स्टेशन शिवनेरीजवळचे सर्वात नजीकचे स्टेशन आहे. पुणे शहर हे मुबई, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, दिल्ली आणि अनेक शहरांनी जुडलेले आहे. आपण गडावर जाण्यासाठी स्टेशन वरून बस किंवा टेक्सी घेऊ शकता.  
 
विमान मार्गाने -
पुणे -लोहगाव विमानतळ शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे.
 
शिवनेरीमध्ये बघण्याचे ठिकाण -
शिवनेरी मध्ये बरीच मौल्यवान ठिकाण बघायला मिळतात. या मध्ये एकूण 7 दार आहे, महादरवाजा, पीर दरवाजा, फाटक दरवाजा, हट्टी दरवाजा, परगंचना दरवाजा, कुल्बखत दरवाजा आणि शिपाई दरवाजा.
 
* जन्म घर-
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथेच झाला होता अलीकडेच ह्या घराचे नूतनीकरण केले आहे.
   
* पुतळे- 
गडाच्या दक्षिणेला जिजाबाई आणि बाळ शिवाजींचे पुतळे आहे.
 
* शिवाई मंदिर- 
गडामध्ये श्री शिवाई देवींचे देऊळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवींच्या नावावर ठेवले होते.
 
* बदामी तलाव -
गडाच्या उत्तरेकडे बदामी नावाचे तळ आहे.
 
* प्राचीन लेण्या- 
गडाजवळ काही भूमिगत बौद्ध प्राचीन लेण्या आहेत 
 
* पाण्याचे साठे- 
गडात काही खडकाचे धरण देखील आहे. गंगा आणि यमुना त्यांच्या मध्ये मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत.   
 
* मुघल मशीद-
मुघल काळातील एक मशीद देखील गडावर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती