आयात केलेला गहू नासका: सोमय्या

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी २००६-०७ मध्ये आयात केलेला निकृष्ट दर्जाचा लाल गहू जंतू संसर्गित आणि नासका होता. त्या गव्हामार्फत २५ प्रकारच्या आक्रमक वीड सीडस्‌ रोगांची भारतात आयात झाली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

देशातील मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, ओरिसा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये विदेशी गव्हातून लागण झालेल्या तणाची रोपे आढळून आल्याचे व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर वीड सायन्स, इंदिरा गांधी ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आदी कृषी संशोधन संस्थांनीदेखील सावधगिरीचा इशारा दिला असल्याची माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली. आयात गव्हामध्ये विदेशी वीडस्‌ अँब्रोसिया ट्रिफिडा, वायोलेस आर्वेनिस, सोंफुस ट्रिब्यूलॉइडस, सिनोग्लॉसम ऑफीनेशल आणि कॅरोलिनेन्स आदी भयानक रोग असल्याची माहितीही सोमैय्या यांनी यावेळी दिली.

वेबदुनिया वर वाचा