हजार फुटांपर्यंतही पाणी लागेना

WD
सलग दोन वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. ग्रामीण भागात हजार फुटांपर्यंत घेण्यात येणार्‍या विंधन विहिरींनाही पाणी लागत नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणच्या सुमारे 15 हजार हातपंपापैकी निम्म्याहून जास्त बंद पडले आहेत. पाण्याची पातळी किती खाली गेली असावी हे यावरून स्पष्ट होते. असे असताना शासनाने मात्र पिण्याच्या पाण्यासाठी फक्त दोनशे फुटच खोल जाण्याचा दंडक घातला आहे. जिल्ह्यात 14 हजार 469 हातपंत आहेत. हातपंपाची संख्या जास्त दिसून येत असली तरी यातील 50 टक्के हातपंपांना पाणीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

वेबदुनिया वर वाचा