सप्टेंबर महिन्यात सात तारखेला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रात अनेक प्राचीन देवीदेवतांची मंदिरे आहे. तसेच महाराष्ट्राला प्राचीन गणपती बाप्पांचा देखील वारसा लाभलेला आहे. प्राचीन मंदिरांसोबत आता आधुनिक युगात विज्ञानाच्या साथीने वेगवगेळ्या ठिकाणी भव्य मंदिरे उभारण्यात आली आहे. पण काही स्थळे इतिहासाची साक्ष देतात. त्यापैकीच एक पर्यटन स्थळ आहे पुण्यातील सारसबाग. सारसबाग अतिशय सुंदर, रमणीय स्थळ आहे. तसेच या रमणीय सारस बागेमध्ये सुंदर असे व भक्तांना आकर्षित करणारे गणपती मंदिर देखील आहे.
सारस बागेतील गणपती मंदिर हे अनेक श्रद्धाळूंना आकर्षित करते. श्रद्धाळू आपली प्रार्थना देवापर्यंत पोहचवण्यासाठी आणि दिव्य ऊर्जा आत्मसात करण्यासाठी या मंदिराच्या परिसरात बसतात. मंदीरामध्ये कृत्रिम सरोवर आहे. सरोवरच्या चारही बाजूला मार्ग आहे. अभ्यागत पायवाटेने चालत जाऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला जलाशयातील मासे पाहता येतील. तसेच कधी कधी संध्याकाळी पाण्याचे कारंज्या देखील सुरू करतात. मग जलाशयला जणू निसर्गाचे अलंकार घातले जातात.
इतिहास-
सारस बागेतील गणपती मंदिर हे सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी आहे मंदिर आहे. या मंदिराचे निर्माण 1784 मध्ये श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या व्दारा करण्यात आले आहे. पण या मंदिराचा इतिहासात असे आढळते की, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पर्वती पहाडांवर एक सरोवर निर्माण करण्याचे आदेश दिले होते. सरोवर तयार झाल्यानंतर नानासाहेबांनी त्याचे नाव सारस बाग ठेवले. मग माधवरावांनी या सारस बागेमध्ये सारस बाग गणपती मंदिराचे निर्माण केले. हे मंदिर सरोवराच्या केंद्र स्थानात स्थापित आहे. यामंदिरामध्ये प्रत्येक दॆवशी हजारोच्या संख्येने श्रद्धाळू दर्शन घेतात. तसेच तसेच चतुर्थी आणि दहा दिवसीय गणेशउत्सव इथे मोठ्या प्रमाणात भव्य साजरा होतो.
सारस बाग गणपती मंदिर पुणे जावे कसे?
राज्य परिवहन बसने पुण्यातील स्वारगेट बस डेपोपर्यंत जात येते. स्वारगेट वरून सारस बागेपर्यंत पोहचण्यासाठी रिक्षा, कॅब करून जाता येते.