Maharashtra Budget 2022 : विकासाची भरारी घेणारा अर्थसंकल्प सादर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शुक्रवार, 11 मार्च 2022 (23:48 IST)
आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.  हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्व क्षेत्रात विकासाची भरारी घेणारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. हा अर्थसंकल्प सर्व सामान्य माणसाच्या, समाजातील दुर्बल घटकांच्या हिताचा आहे. या अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाचा असल्याचे म्हटले.   

 हे अर्थसंकल्प विकासाची पंचसूत्री आहे. या साठी तीन वर्षात 4 लाख कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राला या अर्थ संकल्पाने मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सिंचन क्षमता वाढवणे या साठी हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. 

आरोग्य सुविधांना बळकट करण्यासाठी 16 जिल्ह्यात 100 खाटांची स्त्री रुग्णालये उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षणाचा गुणात्मक आणि दर्जात्मक विकासावर भर करण्यावर देखील नियोजन केले आहे. 
रोजगार संधीत वाढ करण्यासाठी स्टार्टअप फंडासाठी 100 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात देण्यात आला आहे.

सामाजिक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकांच्या व दुर्बल घटकांच्या हितासाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या विकासासाठी तसेच अंगणवाडी मदतनिसांना मोबाईल सेवा देण्यात येणार आहे. बाळ संगोपनासाठी अनुदानात भरीव वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात अमृतमहोत्सवी महिला व बाल भवनांची उभारण्यात येणार आहे.   

भारत रत्न लता मंगेशकर आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी 100 कोटी रुपयांचा निधी, थोर समाज सुधारक व महान व्यक्तींच्या नावे अध्यासन केंद्रे सुरु करण्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी ऐतिहासिक व महत्त्वाच्या शाळांचा विकास, मराठी भाषा भवनासाठी निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 
सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांसाठी 15 हजार 773 आणि बांधकाम 1 हजार 88 कोटी रूपये प्रस्तावित आहेत. समृद्धी महामार्ग भंडारा-गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.
बार्टी , सारथी , महाज्योती या संस्थाना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी 250 कोटी रूपयांची घोषणा करण्यात आली आहे. 

एसटी महामंडळाला 3 हजार नवीन बस गाड्या खरेदी करण्यासाठी तसेच बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी भांडवली अर्थसहाय्य करण्याचा निर्णय देखील अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. 

बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र वसमत येथे सुरु करण्यात येणार आहे. सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती कार्यक्रम आखल्याने विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती सारख्या काही नवीन योजना आणि उपक्रमांची आखणी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

विविध करांवरील सवलतीसाठी अभय योजना, नैसर्गिक वायूवरील कर सवलत, मुद्रांक शुल्कात कर सवलत, जलवाहतुकीस चालना देण्यासाठी कर माफी सारख्या महत्त्वाच्या घोषणा या  अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामुळे या सर्व क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.    
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती