Maharashtra Budget 2022 : राज्यात CNG स्वस्त होणार, अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

शुक्रवार, 11 मार्च 2022 (18:12 IST)
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. सध्या पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने CNG दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आता CNG दर कमी होणार. या सह इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी 5000 चार्जिंग स्टेशन सुविधा देण्यात येणार आहे. 
 
पर्यावरण पूरक असलेल्या CNG वर चालणाऱ्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आणि CNG वर कराची दर  13.5 टक्के वरून कमी करून 3 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा CNG वाहन चालकांना होणार आहे. 
तसेच सध्या इलेक्ट्रिक वाहनाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असून राज्यात 5000 ई चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती