Rahul Gandhi News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मंगळवारी होणारी राहुल गांधी यांची निवडणूक रॅली त्यांच्या विमानातील तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या समर्थनार्थ दुपारी 12.30 वाजता राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करणार होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी एक व्हिडिओ जारी करून रॅली रद्द करण्यामागचे कारण सांगितले.
ते म्हणाले, “मला आज चिखलीला यायचे होते, पण माझ्या विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मी येथे येऊ शकलो नाही. याबद्दल मला खेद वाटतो. मला जाहीर सभेला संबोधित करायचे होते आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी बोलायचे होते. "सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या समस्यांना तोंड देत आहे." यासंदर्भात राहुल गांधी म्हणाले की, “मला माहीत आहे की, भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव देत नाही. विरोधी आघाडी 'इंडिया' सत्तेवर येताच आम्ही तुमच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे गांधींचे विमान टेक ऑफ करू शकले नाही, अशी माहिती समोर आली आहे.