आदर्श आचारसहिंता लागू असतांना नवी मुंबईत कोट्यवधींची रोकड जप्त

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (12:24 IST)
Mumbai News : 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तसेच महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करत आहे, पण तरीही दररोज लाखो कोटींची रोकड जप्त केली जात आहे. सोमवारी ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतून कोट्यवधींची रोकड जप्त केली अशी माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करत आहे, पण तरीही दररोज लाखो कोटींची रोकड जप्त केली जात आहे.
 
सोमवारी ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतून कोट्यवधींची रोकड जप्त केली. ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 16 येथील एका रो-हाऊसमधून सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त केली, अशी माहिती अधिकारींनी सोमवारी दिली.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती