एकत्र राहिलो तर सुरक्षित राहू चिमूरमध्ये पंतप्रधान मोदी यांची गर्जना

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (18:29 IST)
Prime Minister Modi in Chimur: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर पासून असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्व राजकीय पक्ष जाहीर सभा घेत आहे. पंतप्रधान मोदी हे देखील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून जाहीर सभा घेत आहे. आज त्यांनी चिमूर मध्ये सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला.
 
ते म्हणाले, तुम्ही एकत्र राहिला नाही तर कोंग्रेसची मोठी खेळी आहे. 
आदिवासी समाज जातींमध्ये विभागला गेला तर त्याची ओळख आणि ताकद नष्ट होईल. काँग्रेसच्या राजपुत्रांनी स्वतः परदेशात जाऊन याची घोषणा केली आहे. म्हणूनच मी म्हणतो की, काँग्रेसच्या या कारस्थानाला बळी पडण्याची गरज नाही, अपन एकत्र राहिलो तरच सुरक्षित राहू.
 
तुम्ही विभक्त झाला तर कांग्रेस सर्वात आधी आरक्षण संपवणार नंतर ते देशावर राज्य करतील असे विचार करत आहे.  त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने दलित, मागासवर्गीय, आदिवासींना पुढे जाऊ दिले नाही. आरक्षणावरून काँग्रेस चिडली आहे.

महाराष्ट्राला समृद्ध बनवायचे असेल तर आपल्याला आपला शेतकरी समृद्ध करावा लागेल. आज येथील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे. महायुती सरकारही नमो शेतकरी योजनेचा दुहेरी लाभ देत आहे. भाजप आणि महायुती सरकार 'सबका साथ-सबका विकास' या मंत्रावर काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गरीबांच्या जीवनातील अडचणी मला समजतात, त्यामुळे तुमचे जीवन सुकर व्हावे यासाठी मी रात्रंदिवस काम करत आहे.
ALSO READ: बुलढाणा : विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने राहुल गांधींची निवडणूक रॅली रद्द
आपल्या सरकारनेच नक्षलवादाला आळा घातला आहे. आज हा संपूर्ण परिसर मोकळा श्वास घेऊ शकतो. या भागात पुन्हा नक्षलवादाचे वर्चस्व वाढू नये, यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना येथे वर्चस्व गाजवू देऊ नका.
 
महाराष्ट्राचा झपाट्याने विकास करणे हे आघाडीच्या सत्तेत नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. आघाडीच्या लोकांनी विकासाला ब्रेक लावण्यातच पीएचडी केली आहे. कामे रखडवणे, दिरंगाई करणे, वळवणे यात काँग्रेसचे लोक दुहेरी पीएचडी आहेत.आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू आहे,
ALSO READ: नाना पटोले यांच्या 'कुत्रा' वक्तव्यावर भाजपच्या अनुराग ठाकूरचे प्रत्युत्तर
महायुती सरकार कोणत्या गतीने काम करते आणि आघाडीचे लोक कसे काम बंद पाडतात, हे चंद्रपूरच्या जनतेपेक्षा कोणाला चांगले कळेल, असे पंतप्रधान म्हणाले. अनेक दशकांपासून येथील लोक रेल्वे जोडणीची मागणी करत होते, पण काँग्रेस आणि आघाडीने हे काम कधीच होऊ दिले नाही. 

पंतप्रधान म्हणाले की आज मी महाराष्ट्र भाजपचेही अभिनंदन करेन, ज्याने अतिशय उत्कृष्ट संकल्प पत्र जारी केले आहे. या संकल्प पत्रात मुली-भगिनींसाठी, आपल्या शेतकरी बंधू-भगिनींसाठी, युवाशक्तीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक अप्रतिम संकल्प घेण्यात आले आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती