CNG Price Hike in Mumbai : मतदान संपताच मुंबईत CNG महाग,जाणून घ्या नवीन किंमत

शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (14:40 IST)
Mumbai CNG Price: सध्या सर्वत्र महागाई वाढत आहे. मुंबईकर महागाईने वैतागले आहे. मुंबईत मतदान संपताच सीएनजी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मतदानानन्तर मुंबईत शुक्रवार पासून सीएनजी 77 रुपये किलोच्या दराने विकला जात आहे. 
 
महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने मुंबई आणि आसपासच्या भागात तात्काळ प्रभावाने CNG च्या किमतीत प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीची किंमत 75 रुपयांवरून 77 रुपये किलो झाली आहे. 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन किंमत लागू झाली आहे.
 
सीएनजीच्या किमतीत वाढ नैसर्गिक वायू खरेदी आणि इतर परिचालन खर्चासह वाढत्या इनपुट खर्चामुळे झाली आहे.
सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे मुंबई आणि शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होईल आणि परिचालन खर्च वाढेल. तर सीएनजीने चालणाऱ्या वाहनचालकांना देखील तोटा संभवतो. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती