महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. वास्तविक, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. श्रीवास्तव म्हणाले की, पक्षाच्या संसदीय मंडळाने पुलवामा जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी तीन उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे.
जम्मू -काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी 3 टप्प्यात निवडणुका होणार आहेत . याअंतर्गत 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात एकूण 24 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. इतर टप्प्यांसाठी उमेदवारांची नावे आणि इतर संबंधित माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे पक्षाने म्हटले आहे.
या राज्यात 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपने पीडीपी सोबत सरकार स्थापन केले. जम्मू -काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी 3 टप्प्यात निवडणुका होणार आहेत . याअंतर्गत 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात एकूण 24 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. इतर टप्प्यांसाठी उमेदवारांची नावे आणि इतर संबंधित माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे पक्षाने म्हटले आहे