लाडकी बहीण योजनेतील बहिणींचे पैसे परत घेण्याची भाषा करण्याऱ्यांना अजित पवारांचा घणाघात वार

शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (12:27 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका सभेत भाषणादरम्यान आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रया देत घणाघात वार केला आहे. ते म्हणाले, लाडकी बहीण योजने बाबत आम्ही पैसे परत घेऊ असे काहींनी वक्तव्य केले आहे. मला सांगा बहीण भावाला राखी बांधते तेव्हा भाऊ तिला ओवाळणी देतो. किंवा एखादी भेट वस्तू देतो. या भेट्वस्तूवर तिचाच हक्क असतो. भावाने कधीही दिलेली भेट परत घेतलेली नाही आणि घेत नाही. 

अशीच भेट आमच्या बहिणींना आमच्या सरकारने दिली आहे.कोणीही या बाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांची जीभ हासडून काढू. असा इशारा अजित पवारांनी दिला. कोणत्याही अफ़वाहांना बळी पडू नका, त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. असे लोक काहीही बोलतात आणि त्याचा परिणाम पक्षावर होतो. 

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पिंपरीत आली असता अजित पवार सभेत बोलत होते. त्यांनी या वेळी रवी राणा यांना सज्जड दम दिला. सभेला सुनील तटकरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पार्थ पवार, माजी महापौर मंगला कदम, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, योगेश बहाल, सुरज चव्हाण आणि कविता आल्हाट उपस्थित होते. 

मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. येत्या 48 तासांत लाडली ब्राह्मण योजनेचे पहिले दोन हप्ते एकूण 3000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. 
आमदार रवी राणा यांनी विदर्भातील एका जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, कोणतीही लाभार्थी महिला त्यांना मतदान करणार नाही, त्या लाभार्थीच्या खात्यातील 1500 रुपये काढले जातील.त्याच्यावर अजितपवारांनी वक्तव्य दिले आहे. 
Edited by - Priya Dixit  
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती