अजित पवार यांनी घेतली अमित शहा यांची दिल्लीत भेट, 80-90 जागांच्या मागणीवर ठाम!

बुधवार, 24 जुलै 2024 (16:27 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व जागावाटपाच्या प्रश्नावर एकमत होण्यासाठी त्यांनी बुधवारी आज अमित शहांची भेट घेतली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी महायुतीत एकत्र होताना दिलेल्या आश्वासनानुसार, 80 ते 90 जागांवर दावा केला आहे. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या 54 जागा कायम ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देश भागातून काँग्रेसच्या विरोधात 20 जागांवर लढविण्याच्या विचार करत आहे. 

त्यांनी मुंबई काँग्रेसच्या विरोधात 4 ते 5 जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या पक्षाचे 3 अपक्ष आणि काँग्रेसचे 3 आमदार निवडणूक लढवण्याचा विश्वास आहे. 

या वर्षाच्या शेवटी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होणार असून सध्या राजकीय पेच वाढत  आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीच्या जागावाटप बाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. अमित शहा आणि अजित पवारांच्या भेटी नंतर देवेंद्र फडणवीस हे देखील सकाळी दिल्लीत पोहोचले .
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती