आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडी जिंकणार असा मला विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सक्रिय राहावे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या प्रचारावर कठोर भूमिका घ्या. विरोधक वेगवेगळ्या समाजात तेढ निर्माण करत आहे. राजकीय फायदा मिळवायची विरोधक फूट वाढवत आहे. हा खोटा प्रचार सध्याच्या काळातील नव्या रावणा प्रमाणे आहे. त्याच्या नाभीला भेदले पाहिजे. त्यांचे हे प्रयत्न आपण हाणून पडले पाहिजे.
विरोधक हिंदूंना हिंसक म्हणतात. आम्ही हिंदू आहो असे अभिमानाने सांगा. भारतीय जनता पक्षातील प्रत्येकाला मैदानात उतरून चांगले प्रदर्शन करायचे आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आदेशाची वाट न पाहता विरोधकांना ठोकून काढावे असे आदेश दिले.फडणवीसांच्या या आदेशावर कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला.हे अधिवेशन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे.