करार या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (12:52 IST)
आयुष्याला व्यवहाराच्या नजरेतून पाहणाऱ्या लोकांवर टीका करणाऱ्या ‘करार’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर उलगडला आहे. मनोज कोटियन दिग्दर्शित 'करार' या सिनेमाचे क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी निर्मिती केली आहे. तसेच परेश दवे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
 
आपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यास  नेहमी तत्पर असलेला अभिनेता सुबोध भावे यात मध्यवर्ती भूमिकेतून दिसणार आहे. त्यांच्यासह उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर पण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सुहासिनी मुळे आणि आरती मोरे या देखील या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.
 

‘करार’ हा एक कौटुंबिक सिनेमा असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या सिनेमात पाहायला मिळणार आहे. संजय जगताप लिखित या सिनेमाची पटकथा आणि संवाद हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले असून हा सिनेमा नवीनवर्षाच्या सुरवातीला म्हणजेच १३ जानेवारी २०१७ ला महाराष्ट्रभर होण्यासाठी सज्ज झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा