संसदेचे अधिवेशन फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवडय़ात

WD
लोकसभा निवडणूक एप्रिल - मेमध्ये होण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकार फेब्रुवारीच्या पहिल्याच पंधरवडय़ात संसदेचे अधिवेशन बोलावणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी आज सांगितले.

लोकसभेची निवडणूक असल्यामुळे या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यात येणार नसून केवळ मेपर्यंतच्या अर्थसंकल्पीय खर्चाला `वोट ऑन अकाऊंट’ मांडून मंजुरी घेण्यात येईल. फेब्रुवारीमधील अधिवेशन हे पंधरा किंवा दहा दिवसांचे असेल. याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे कमलनाथ यांनी पत्रकारांना सांगितले.

निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात लोकसभेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात पाच ते सहा टप्प्यांमध्ये घेण्यात येईल. या निवडणुकीनंतर नव्या मंत्रिमंडळाकडूनच पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा