अण्णा द्रमुक+भाजप यूती?

अण्णा द्रमुक नेत्या जयललिता यांच्याशी निवडणुकांनंतर युती करण्‍याबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगत अण्णा द्रमुक पुन्हा एकदा एनडीएमध्ये येण्याचे संकेत पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी दिले आहेत.

निवडणुकांनंतर जर बहुमतासाठी काही खासदार कमी पडले तर भाजप अण्णा द्रमुकची मदत घेऊ शकते या बाबत चर्चा सुरु असल्याचे अडवाणी म्हणाले.

एनडीएमध्ये सामिल व्हायचे का नाही हा निर्णय द्रमुकचा असून, आपण केवळ ही शक्यता व्यक्त केल्याचेही अडवाणी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा