भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 70 जणांची नावे आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील 20 जणांची नावे आहे. या मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान खासदाराला भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे. कलाबेन डेलकर यांना भाजपने दादरा व नगर हवेलीची उमेदवारी दिली आहे. कलाबेन डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर यांचा 2021 मध्ये मृत्यू झाला. पोटनिवडणुकीत भाजपने महेश गावित यांना तिकीट दिले होते तर शिवसेना ठाकरे गटाकडून कलाबेन यांना उमेदवारी देण्यात आली होती.
नंदुरबारमधून हिना गावीत, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगांवमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामचंद्र तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव पाटील, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीमधून कपिल पाटील, ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारेे, माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.कर्नाटकात चिकोडीमधून अण्णासाहेब जोल्ले, विजापूरमधून रमेश जिगजिनगी, गुलबर्ग्यातून उमेश जाधव यांना संधी मिळाली आहे. हावेरीतून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना तिकीट देण्यात आले आहे. धारवाडमधून प्रल्हाद जोशी तर म्हैसूरमधून यदुवीर वाडियार यांना संधी मिळाली आहे.
बंगळुरू उत्तरमधून शोभा करदलांजे यांना बंगळुरू दक्षिणमधून तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी मिळाली आहे. कर्नाटकातील 26 जागांची यादी यामध्ये आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हमीरपूरमधून अनुराग ठाकूर, शिमल्यातून सुरेश कश्यप यांना संधी देण्यात आली आहे.