या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे. यातच, पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आलेल्या एका सर्व्हेमध्ये राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी एनडीएला 28 जागा मिळताना दिसत आहेत. यांपैकी 25 जागा भाजपला, तर तीन जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळण्याची शक्यता आहे.
याच बरोबर, I.N.D.I.A. ला 20 जागा मिळताना दिसत असून. यांपैकी 10 जागा शिवसेनेला (ठाकरे गट) मिळण्याची शक्यता आहे. हा सर्व्हे टीव्ही 9, पीपल्स इनसाइट पोलस्ट्रॅटने केला आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व्हेमध्ये जवळपास 25 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. उमेदवारांचा विचार करता या सर्व्हेमध्ये नागपूरमधून नितिन गडकरी, बारामतीतून सुप्रिया सुळे तर उत्तर मुंबईतून पियूष गोयल विजयी होताना दिसत आहेत.
मतांच्या टक्केवारीचा विचार करता एनडीएला 40.22 टक्के, I.N.D.I.A. ला 40.97 टक्के तर इतरांना 3.22 टक्के, तर 15.59 टक्के मते निश्चित नाहीत.