नितीन गडकरींबाबत संजय राऊत यांचा मोठा दावा, म्हणाले जागावाटप फक्त निमित्त

शनिवार, 9 मार्च 2024 (12:07 IST)
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडी (MVA) मध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली. यानंतर माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ऑफरवर पक्ष आणि विरोधकांच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आधी भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि नंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची खरडपट्टी काढली. तर मुनगंटीवार यांनी थेट उद्धव ठाकरेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. त्याचवेळी उद्धव गटनेते संजय राऊत यांनी याप्रकरणी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
'गडकरींना अपमानित करण्याचे षडयंत्र'
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर लिहिले, “सत्य असे आहे की देवेंद्र फडणवीस हे मोदी शहा यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राचे, नागपूरचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव असायलाच हवे असा आग्रह ते करु शकले असते. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्यामुळे महाराष्ट्राची यादी प्रलंबित आहे हा केवळ बहाणा आहे. गडकरींच्या नागपूर मतदारसंघाचा महायुतीच्या जागावाटपाशी कवडीचाही संबंध नाही. गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आली असून या कारस्थानात केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून फडणवीसही आनंदाने सामील झाले आहेत.
 

सत्य असे आहे की:
देवेंद्र फडणवीस हे मोदी शहा
यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राचे, नागपूरचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव असायलाच हवे असा आग्रह ते करु शकले असते.… pic.twitter.com/MMobUyPsHa

— Sanjay Raut (@rautsanjay61) March 8, 2024
नाव कधी येणार हे फडणवीस यांनी सांगितले
तत्पूर्वी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नितीन गडकरी हे भाजपचे मोठे नेते आहेत. उद्धव यांच्या पक्षाचा बँड वाजू लागला आहे. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा गडकरींचे नाव पहिले असेल. राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे त्यांचे नाव जाहीर करण्यात आले नाही.
 
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 2024 च्या उमेदवारांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर केली होती. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांची नावे आहेत. पण, महाराष्ट्रातील 48 जागांपैकी एकाही जागेवर नाव नव्हते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती