अनेक दिवसांपासून माढा या लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा आहे. आता महाविकास आघाडीतर्फे माढ्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जनाकर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. कारण शरद पवार यांच्या वाट्याला आलेल्या 9 जागांची संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये माढा या मतदारसंघाचा समावेश आहे. माढ्यासह बारामती, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या जागांदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याचे म्हटले जात आहे.
शरद पवार माढ्यातून जानकर यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शरद पवार यांच्याकडून जानकर यांच्या नावाचा विचार चालू झाल्यानंतर खुद्द महादेव जानकर यांनीदेखील हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी भाजपाचे नाराज नेते मोहिते पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील संजीवबाबा निंबाळकर यांची भेट घेतली होती. दुसरीकडे भाजपाकडून रणजितसिंह निंबाळकर हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे येथे जानकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.