माविआ कडून काही दिवसांपूर्वी जागा वाटपाची घोषणा करण्यात आली असून या मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेस पक्षाला 17 जागा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला फक्त 10 जागा मिळाल्या असून ते 10 लोकसभा मतदार संघात उमेदवार उभे करणार आहे. शरदचंद्र पवार गटाला फक्त 10 जागा का मिळाल्या या वर माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी आपला मास्टर प्लॅन सांगितला.