रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली

शनिवार, 4 मे 2024 (00:02 IST)
रायबरेलीमधून उमेदवारी दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, 'रायबरेली मधून उमेदवारी हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता. माझ्या आईने कुटुंबाची कर्मभूमी माझ्यावर विश्वासाने सौपवली असून मला सेवा करण्याची संधी दिली आहे. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी काही वेगळे नाही. दोघेही माझे कुटुंब आहे. अन्यायाविरुद्ध सुरु असलेल्या न्यायाच्या लढाईत मी माझ्या प्रियजनांचे आशीर्वाद मागतो. तुम्ही माझ्या पाठीशी आहेत असा मला विश्वास आहे. 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा करणाऱ्या किशोरीलालजी अमेठीतून पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहे याचा मला आनंद आहे.    

राहुल गांधी यांनी दुपारी 2 :15 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, सोनिया गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.  

राहुल गांधी आज सकाळीच एका विशेष विमानाने फुरसातगंजला पोहोचले होते . तेथून अमेठीमार्गे रायबरेलीला आले. रायबरेली येथील केंद्रीय काँग्रेस कार्यालयात पूजा केल्यानंतर राहुल यांची नामांकन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. 
 
रायबरेली मतदार संघातून राहुल यांना भाजपचे दिनेश प्रताप दुसऱ्यांदा गांधी कुटुंबाला लढत देणार आहे. दिनेश प्रताप यांनी 2019 मध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. 
 
 Edited By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती