लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक राधिका खेडा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. तिने सोशल मीडियावर ट्विट करून लिहिले की, आज मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तसेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
राधिका यांनी सोशल मीडिया x वर ट्विट करत तीन पानांचे राजीनामा पत्र लिहिले आहे. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना राजीनामा दिला. त्यांनी त्यात लिहिले आहे. धर्माचे समर्थन करणाऱ्यांना विरोध पत्करावा लागतो. हे अनादी काळापासून चालत आले आहे. सध्या प्रभू श्रीरामांचे नाव घेणाऱ्या लोकांना काही जण विरोध करत आहे.
ज्या पक्षाला मी माझ्या आयुष्यातील 22 पेक्षा जास्त वर्षे दिली, जिथे मी NSUI पासून ICC च्या मीडिया विभागापर्यंत सर्व गोष्टींमध्ये पूर्ण प्रामाणिकपणे काम केले. अयोध्येतील रामललाला भेट देण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही म्हणून आज मला तिथं तीव्र विरोध होत आहे. हा विरोध एवढा टोकाला जाऊन पोहोचला की छत्तीसगड प्रदेश कार्यालयात मला न्याय दिला गेला नाही. तेव्हा मला पक्षात पराभव मिळालं.एक प्रभू श्रीरामाची भक्त आणि एक महिला म्हणून मला खूप दुःख झाले आहे. प्रत्येक वेळी पक्षश्रेष्ठींना सर्व माहिती देऊनही मला न्याय मिळाला नाही.