जागतिक दृष्टीदान दिन: नेत्रदानाचे महत्व

सोमवार, 8 जून 2020 (07:26 IST)
जागतिक दृष्टीदान दिन कधी साजरा केला जातो
नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते. 
 
उद्देश्य
जागतिक दृष्टीदान दिनाचे उध्दिष्टये नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे.विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे. 
 
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
* चांगल्या दृष्टीक्षेपासाठी निरोगी आहाराचे सेवन करावं: - आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, बीन्स, आणि गाजराचा समावेश जास्तीत जास्त करावा.
* धूम्रपान सोडावं :- धूम्रपान केल्यामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक आणि मज्जातंतूच्या नुकसानासह दृष्टी संबंधित समस्या उद्भवतात. 
* सूर्याच्या थेट प्रकाशापासून वाचण्यासाठी यूव्ही सनग्लासेस वापरा: - जे आपल्या डोळ्यांचा संरक्षणासाठी चांगले आहेत.
* सेफ्टी ग्लासेस वापरा :- आपण कार्यस्थळी धोकादायक पदार्थासोबत काम करीत असल्यास आपल्याला आपले डोळ्यांच्या संरक्षणासाठी सेफ्टी ग्लासेस घालणे आवश्यक आहे.
* संगणकावर बऱ्याच काळ काम करीत असल्यास : वारंवार जागेवरून उठा. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी डोळ्यांची उघडझाप करा.
* टीव्ही बघताना किंवा संगणकावर काम करतांना अँटी ग्लेयर चष्माचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
* कमी प्रकाशात वाचू नका : डोळ्यांच्या त्रासांसाठी हे देखील कारणीभूत असतं.
* डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमाने डोळ्यांची तपासणी करा.
* खिडकी किंवा दिव्यांमधून येणार थेट प्रकाश संगणकावर पडू देउ नये. डोळ्यांवर चकाकी पासून वाचण्याचा प्रयत्न करा. गरज असल्यास अँटी ग्लेयर स्क्रीनचा वापर करा.
* कॉन्टॅक्ट लॅन्सचा वापर करीत असाल तर जास्त काळ घालण्यापासून टाळावं: कॉन्टॅक्ट लॅन्स वापरताना पोहणे आणि झोपणे टाळा. 
 
असे बरेच कारणे आहेत ज्यामुळे लोकं नेत्रदान करत नाही. भारतामधील नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खालील कारणांमुळे अत्यंत कमी आहे-
1 सामान्य लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव 
2 संस्था आणि रुग्णालयात अपूर्ण सुविधा
3 प्रशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतरांना प्रेरित करण्याची क्षमता नसणे
4 सामाजिक आणि धार्मिक मान्यता

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती