Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग सोडा

सोमवार, 1 जून 2020 (18:15 IST)
आपल्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जी आपल्या केसांना आणि त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवते. आम्ही येथे बेकिंग सोड्याबद्दल बोलत आहोत. भारतीय स्वयंपाकघरात असे बरेच पदार्थ आहे ज्यामध्ये सोड्याचा वापर करतात. म्हणून हे प्रत्येकाचा घरात आढळतं. 
 
बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट असतं. जे की नैसर्गिक आहे. पांढऱ्या रंगाचा पावडरच्या रूपात उपलब्ध असतं. ह्याचा संदर्भात एक विशेष गोष्ट अशी की या मध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल, अँटी सेप्टिक आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. या व्यतिरिक्त हे सर्दी, पडसं, तोंडाच्या समस्या आणि त्वचे संबंधित आजारांपासून संरक्षण करतं. 
 
बेकिंग सोड्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया...
चेहऱ्यांवर मुरुमांचा त्रास असल्यास बेकिंग सोडा खूप प्रभावी आहे. यात आढळणारे अँटी सेप्टिक आणि अँटी इफ्लेमैटोरीचे गुणधर्म मुरुमांच्या आकाराला कमी करतं आणि नवे मुरूम येण्यापासून रोखण्यास मदत करतं. 
 
बेकिंग सोड्यामध्ये त्वचेचे पीएच नियंत्रित करण्याचे गुण असतात. जे त्वचेमधील होणाऱ्या नुकसानाला टाळतात. बेकिंग सोडा वापरासाठी एक चमचा सोडा घेऊन पाण्याबरोबर पेस्ट बनवून त्वचेवर 1 ते 2 मिनिटे लावून थंड पाण्याने धुऊन घ्या. ही पेस्ट दररोज दिवसातून एकदा किमान दोन ते तीन दिवस वापरावे. नंतर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा वापरावे.
 
पांढरे दात हवे असणाऱ्यांना बेकिंग सोडा खूप प्रभावी आहे. बेकिंग सोडा दातांवरची पिवळसर थर काढतो. त्याच बरोबर हे जिवाणूने तयार केलेले अॅसिड काढून दातांना प्लाक पासून संरक्षण करतं. यासाठी आपल्या टूथ ब्रश वर टूथ पेस्टसह बेकिंग सोडा घ्या आणि किमान 2 मिनिटे ब्रश करा. काही दिवस दररोज असे केल्याने दातांचा पिवळसरपणा नाहीसा होईल.
 
लक्षात ठेवा : बेकिंग सोड्याचा वापर जास्त प्रमाणात करणं टाळावं. कोणत्याही उपायाला काही दिवसच करावे. जास्त काळ केल्याने बेकिंग सोडा दातांच्या वरील नैसर्गिक एनामेलची परत काढून टाकेल.
 
बेकिंग सोडा हे अल्केलाईन धर्मी असत. सूर्याने भाजलेला त्वचेवर हे उत्कृष्ट परिणाम देतं. याला वापरण्याने खाज आणि जळजळ नाहीशी होते. अँटिसेप्टिक असल्याने सनबर्न मध्ये खूप प्रभावी असतं. या साठी 1 किंवा 2 चमचे बेकिंग सोड्याला एक कप पाण्यामध्ये घोळून एका स्वच्छ कापड्याला या घोळामध्ये भिजवून भाजलेल्या जागेवर 5 ते 10 मिनिटे ठेवावं. याची पुनरावृत्ती दिवसातून किमान 2 ते 3 वेळा करावी.
 
त्वचेचा रंग एकसारखा नसल्याची खंत बऱ्याच जणांना असते. आपल्याला चकाकणारी त्वचेची इच्छा असल्यास बेकिंग सोडा आपली मदत करू शकतो. बेकिंग सोड्यामध्ये मृत त्वचेला काढण्याचे गुणधर्म असतात. या व्यतिरिक्त हे पीएच पातळीला देखील संतुलित ठेवतं. जेणे करून त्वचा सुंदर राहते.
 
या व्यतिरिक्त एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबाच्या रसात 4 ते 5 थेंबा वर्जिन ऑलिव्ह तेलाच्या घालाव्यात. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 5 मिनिट तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. एका आठवड्यात 2 ते 3 वेळा हे उपाय करू शकता.
 
मान, कोपर्‍याच्या काळपटपणामुळे त्रासला आहात तर एक चमचा बेकिंग सोडा घेऊन यामध्ये नारळाचे तेल मिसळा. या पेस्टला मानेवर आणि कोपऱ्यावर लावावे. नियमाने हे अंघोळीच्या आधी वापरावे. काहीच दिवसात आपल्याला परिणाम दिसून येईल. 
 
नखाच्या रंगाला घेऊन काळजीत आहात. तर बेकिंग सोड्याहुन दुसरे कोणतेही उपाय नाही. बेकिंग सोड्यामध्ये ब्लीचिंग आणि एक्सफोलिएटिंगचे गुणधर्म आहेत. ज्याने नखाचा रंग सुधारतो. 
 
अर्धा कप पाणी, एक तृतियांश चमचा हाइड्रोजन पेरॉक्साइड आणि एक चमचा बँकिंग सोडा मिसळून चांगला घोळ तयार करा. आपल्या नखांना या घोळात 2 ते 3 मिनिटे बुडवून ठेवा. हे उपाय 15 दिवसातून एकदा करू शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती