फ्लाइटमध्ये महिलेच्या अंगावर पडली गरम कॉफी, एअरलाइन्सवर 83 कोटी रुपयांचा दावा ठोकला

बुधवार, 18 जून 2025 (14:35 IST)
विमान प्रवासात लहान सहान समस्या होणे सामान्य आहे. पण एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे कोणाची सुट्टी खराब ओट असेल किंवा आर्थिक नुकसान होत असेल तर प्रकरण गंभीर ठरते.  अशीच एक घटना न्यू यॉर्कमधील एका वृद्ध जोडप्यासोबत घडली, ज्यांची क्रूझ ट्रिप अपघातामुळे दुःखद अनुभव बनली. तथापि, ही निष्काळजीपणा पाहून या जोडप्याने एअरलाइन्सविरुद्ध 83 कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे.
ALSO READ: आम्ही फक्त जिवंत राहण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्हाला येथून बाहेर काढा, इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची विनंती
78 वर्षीय आयमारा कार्बो पतीसह ग्युसेप्पेसोबत स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये प्रवास करत होत्या. त्यांनी प्रवासात फ्लाईट अटेंडंट कडून कॉफी मागवली. पण सर्व्हिस देताना फ्लाईट अटेंडेन्टकडून कप निसटून कॉफी त्यांच्या मांडीवर पडली. गरम कॉफी अंगावर पडल्यामुळे आयमारा गंभीर भाजल्या. पूर्ण प्रवासात त्यांना जास्त वेळ केबिन मध्ये घालवावा लागला. त्यांच्या पतीला देखील त्यांची काळजी घ्यावी लागायची .
या मुळे त्यांच्या सम्पूर्ण सुट्ट्या वाया गेल्या. त्यांच्या दोन आठवड्यांचा प्रवास त्रासातच गेला. 
ALSO READ: Safest Seat in Flight फ्लाईटमध्ये सर्वात सुरक्षित सीट कोणती? कोणत्या सीटवर बसलेल्या एकमेव प्रवाश्याचा जीव वाचला
या घटनेनन्तर दाम्पत्याने एअरलाइन्सविरुद्ध 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 83.45कोटी रुपयांचा दावा दाखल केला. त्यांचे वकील जोनाथन रीटर यांनी असा दावा केला की एअरलाइन्सने गरम पेये देताना सुरक्षा नियमांचे पालन केले नाही आणि वृद्ध प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणात, वैद्यकीय खर्च, मानसिक आघात आणि सुट्ट्यांचे नुकसान यासाठी भरपाईची मागणी करण्यात आली आहे.अद्याप स्कॅन्डिनेव्हियन एअरलाइन्सकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 
ALSO READ: येथे मुलींना मिठी मारून कमाई करत आहे मुले, ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये आकारतात
ही बाब आता आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे आणि विमान सेवांमधील सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. लोकांचे म्हणणे आहे की या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे कधीही दुर्लक्ष केले जाऊ नये, विशेषतः जेव्हा प्रवासी वृद्ध असतात. एक छोटीशी निष्काळजीपणा मोठी दुर्घटना घडवू शकते.
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती