व्हॅाटसअ‍ॅपमुळे चुकून नेलेली गाडी जेव्हा सापडते , वाचा पूर्ण गंमत

मंगळवार, 26 जुलै 2022 (08:23 IST)
अनेक वेळा चुकून दुसऱ्याची गाडी समजून आपण आपलीच गाडी समजतो आणि त्यातून मोठा गोंधळ होतो. पण, एका गाडीची चावी दुसऱ्या गाडीला कशी लागू शकते..पण असे घडले आहे मनमाडमध्ये. शहरातील नावाजलेल्या सानप कॉम्प्लेक्स मध्ये एका व्यक्तीने आपली पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी पार्किंग मध्ये लॉक केली आणि ते आपल्या कामा साठी निघून गेला. त्याचवेळी दुसऱ्या रंगाच्या तशाच गाडीवर एक तरुण तेथे आला आणि तो आपल्या कामाला गेला. मात्र जाताना पठयाने चक्क दुसऱ्याच गाडीला चावी लावत ती घेऊन गेला. आपली गाडी कुठेच दिसत नाही ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा त्या व्यक्तीने पोलिसात तक्रार अर्ज दिला. 

त्यानंतर जवळ असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये तपासणी केली असता काळ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवर आलेल्या तरुणाने जाताना पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी नेली हे दिसून आले. ज्यांची पांढऱ्या रंगाची गाडी गेली होती त्यांनी गाडी चोरीला गेली याचे सीसीटीव्ही फोटो सगळ्या व्हॅाटसअॅप ग्रुपवर टाकले. त्यानंतर सहातासानंतर ही गाडी शहरातील एका बार जवळ उभी असल्याची माहिती मिळाली. मात्र ज्या तरुणाने ही गाडी आपण आणली होती तीच ही आहे समुजन नेली. त्याच्याच मालकाने त्याची गाडी कुठे याचा शोध घेतल्यावर हा सगळा प्रकार समोर आला. एकूणच व्हॅाटसअॅपमुळे हे सगळं प्रकरण समोर येऊन मूळ मालकान त्यांच्या दुचाकी परत मिळाल्या. दुचाकी घेऊन जाणाऱ्याला आपण कुठली गाडी आणि कुठली घेऊन जातोय हेच उमगले कसे नाही. हा मात्र गंमतीचा तसा तितकाच गंभीर विषय झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती