मग आपत्कालीन स्थितीत इंटरनेट सुरु, पण अ‍ॅप बंद

मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (09:04 IST)
देशात सोशल मीडियामुळे पसरणाऱ्या अफवा आणि त्यातून निर्माण होणा-या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या स्थितीत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व सोशल मिडिया अ‍ॅप्सवर प्रतिबंध आणण्याचा मार्ग सरकार शोधत आहे. अशा परीस्थीतीत विशेष म्हणजे आपत्कालीन स्थितीत इंटरनेट सुरु राहिले तरी हे अ‍ॅप मात्र बंद केले जातील.
 
याचा अर्थ व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमांवर लगेचच प्रतिबंध लादले जातील, असा मुळीच नाही. परंतु, विशिष्ट भागात तणाव वाढत असेल तर किंवा आणीबाणीची स्थिती उत्पन्न होत आहे असे दिसले तर त्यावेळी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर प्रतिबंध कसे आणता येतील याचे पर्याय शोधले जावेत व त्याबाबत दिशा-निर्देश निश्चित केले जावेत अशी यामागची भूमिका आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती