Instagram ने लाँच केली नवीन सेवा, झाले 1 अरब यूजर्स

शुक्रवार, 22 जून 2018 (11:41 IST)
बुधवारचा दिवस इंस्टाग्रामसाठी ऐतिहासिक ठरला. या सोशल साईटच्या यूजर्सची संख्या बुधवारी एक अरब झाली आहे. याचे मुख्य कारण असे  मानण्यात येत आहे की इंस्टाग्रामने यूट्यूब प्रमाणे जे आयजीटीवी सुरू केले आहे त्यामुळे यूजर्सची संख्येत वाढ होत आहे. इंस्टाग्राम आता फेसबुकचा चवथा असा प्लॅटफॉर्म बनला आहे ज्याने एक अरब यूजर्सचा आकडा क्रास केला आहे.
 
फेसबुकचे स्वत:चे दोन अरब (2 billion) पेक्षा जास्त यूजर्स आहे. जेव्हा की वॉट्सएप आणि मेसेंजरने देखील एक-एक अरब यूजर्सचा आकडा क्रास केला आहे. इंस्टाग्रामजवळ मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 800 मिलियन अर्थात 80 कोटी यूजर्स होते. झपाट्याने लोकप्रिय होणार्‍या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्माने ट्विटर आणि स्नॅपचेटला देखील मागे टाकले आहे. रिपोर्टनुसार इंस्टाग्रामला यंग जनरेशन जास्त पसंत करत आहे जेव्हा की फेसबुकवरून तरुणांची संख्या आता कमी होत आहे.
 
इंस्टाग्रामचे सीईओ केविन सिस्टॉर्म यांनी इंस्टाग्रामचे नवीन फीचर आयजीटीवी लाँच केल्यानंतर या यशाबद्दल माहिती दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती