इंस्टाग्राम झाले म्युझिकल

बुधवार, 4 जुलै 2018 (16:14 IST)
आता अगदी सहजपणे इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्युजिक अॅड करता येणार आहे. इंस्टाग्रामने गेल्या आठवड्यातच हे फिचर युजर्ससाठी सुरु केले. फेसबुकने अलिकडेच रेकॉर्ड लेबलसोबत करार केला होता. त्यामुळे या ट्यून्स आता इंस्टाग्रामवर उपलब्ध होईल. हे फिचर सध्या ऑस्ट्रेलिया, न्युझीलॅंड, फ्रॉन्स, जर्मनी, स्वीडन, युनाइटेड किंगडम आणि युनाइटेड स्टेट्ससाठी आहे. स्टिकर्स आणि जीआयएफ प्रमाणेच याचा वापर होतो.
 
इंस्टाग्राम स्टोरीसाठी फोटो किंवा व्हिडिओ शूट केल्यानंतर स्क्रिन वर उजवीकडे स्माईली बटनावर टॅप करा. तिथेच दुसऱ्या लाईनवर म्युजिक बटनाचा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप केल्यावर म्युझिक मेन्यू ओपन होईल. त्यातून त आवडीचे म्युझिक सिलेक्ट करायचे आहे. याशिवाय  लोकप्रिय म्युझिक येथे  डिफॉल्ट मिळणार आहेत. याबरोबरच एका टॅब आहे. त्याच्या मदतीने मूडप्रमाणे म्युझिक सिलेक्ट करता येईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती