महान भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी विकलांग अवस्थेत 54 वर्षे ज्या व्हीलचेअरवर बसून मोठमोठे शोध लावले. आता त्या व्हीलचेअरची लिलावात विक्री होणार आहे. या चेअरसोबत हॉकिंग्स यांच्या 22 व्यक्तिगत वस्तूंचाही लिलाव लंडनच्या ख्रिस्ती या प्रसिद्ध लिलाव कंपनीने आयोजित केला आहे. लिलाव होणाऱ्या वस्तूंत हॉकिंग्स यांचा ब्रह्मांड उत्पत्तीवरील प्रबंध त्यांना मिळालेले पुरस्कार आणि काही शास्त्रीय शोधपत्रांचा समावेश आहे.