राहुल महाजनचे तिसऱ्यांदा लग्न

शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:25 IST)
भाजप नेते कै. प्रमोद महाजन यांचा चिरंजीव राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. ४३ वर्षाच्या राहूलने १८ वर्षांनी लहान असणाऱ्या २५ वर्षीय कझाकिस्तानी मॉडल नताल्या इलीनाशी विवाह केला आहे. एका खासगी समारंभात २० नोव्हेंबरला विवाह झाल्यानंतर राहुलचे फोटो व्हायरल झाले आहेत. मलबार हिलमधील एका मंदिरामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी महाजन कुटुंबिय आणि फक्त जवळच्या पाहुण्यांची उपस्थिती होती. 
 
राहूलने पहिला विवाह २००६ मध्ये पायलट असलेल्या श्वेता सिंह हिच्याशी केला होता, पण दोन वर्षामध्येच दोघांमध्ये वितुष्ठ येऊन घटस्फोट झाला. श्वेताने राहूल  मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याने २०१० मध्ये राहुल दुल्हनिय ले जाएंगे या टीव्ही रियालिटी शो मधून दुसऱ्यांदा राहुलने डिंपी या मॉडलशी विवाह केला. हा विवाह सुद्धा चार वर्षच टीकला. राहुल आणि डिंपीचा २०१४ घटस्फोट झाला.त्यानंतर डिंपीने दुबईस्थित उद्योगपतीशी विवाह केला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती